नाशिक प्रतिनिधी : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मयत डॉ स्वप्नील महारुद्र शिंदे गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थी डॉकटरने रॅगिंग मुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांनी मागणी केली आहे.
कॉलेज प्रशासनाकडून आरोपांचे खंडन केले असून आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉकटरला वेळो वेळी सहकार्य केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मयत झालेल्या विद्यार्थी डॉकटरवर मानसोपचार सुरू असल्याची कॉलेज प्रशासनाची माहिती देण्यात आली आहे
मानसिक स्थिती ठीक नसल्याने मयत डॉक्टर विद्यार्थ्यांच्या आईला मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी. दिली होती यामुळे कॉलेज प्रशासनाने सर्वतोपरी मदत केल्याचा दावा केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम