नाशिक प्रतिनिधी : शहरातील 80 वर्षीय वृद्धाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 9 ऑगस्टला आत्मदहणाची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. ‘मी सुशिक्षित बेरोजगार असून प्रशासन माझ्या मरणाची वाट पहात आहे, त्यामुळे प्रशासनाच्या समाधानासाठी मला मरण्याची परवानगी द्यावी असे पत्रात म्हटले आहे.
या वृद्धावर ही वेळ का आली हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. ग्रॅज्युटीसह देय असलेली रक्कम अडकलेली आहे . अनेक दिवसांपासून प्रयत्न करून कायदेशीर मार्ग वापरून देखील संबंधित कंपनी कुठलीही दखल घेत नसल्याने, या वृद्धाने वैतागून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल आहे. नाशिक येथे इंदिरानगर येथील रहिवासी रत्नाकर साठे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
18 ऑक्टोबर 76 ते 5 नोव्हेंबर 1987 या 11 वर्ष दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना 2 हजार 285 इतका पगार होता. 11 नोव्हेंबर 1987 मध्ये त्यांना कामावरून कमी केले. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युटी व बाकी हक्काच्या पैशांसाठी त्यांनी कंपनीला नोटीस पाठवली. तसेच कामगार आयुक्तांकडे दावा दाखल केला. त्यावर 25 जुलै 2011 ला निकाल दिला 11264 रुपये व त्यावरील 12% व्याज देण्यात आले. मात्र अद्यापही ती रक्कम देण्यात आलेली नाही. पुन्हा कामगार आयुक्तांकडे दावा दाखल केला त्यावर आयुक्तांनी 92 लाख 63 हजार 287 रुपये रक्कम निश्चित केली मात्र अजूनही रक्कम मिळाली नसल्याने. क्रांतिदिनी आत्मदहणाची मागणी साठे यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम