मुख्यमंत्रीसाहेब ‘गांजा’ अन ‘अफू’ पिकवण्याची परवानगी द्या

0
12

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देशात सध्या शेतकरी संकटात असून त्याला उभारणी देण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहे. सरकारने नुकतीच वाईन सुप्रमार्केटमध्ये विकायला परवानगी दिली आहे. यावर सर्वत्र टीका होत असतांना शेतकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर गांजा अन अफूची परवानगी द्या साहेब म्हणून मोहीम चालवली आहे. वाईन मुळे शेतकऱ्यांना कसला फायदा होणार आहे असा संतप्त सवाल देखील शेतकरी विचारत आहेत.

आमच्या टीमने द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी देखील या योजनेचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. हा नियम व्यापार धार्जिना असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नसून वाईनच्या नावाखाली अन्य मद्य विकली जाईल व तरुण बिघडेल अशी भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी हा सध्या आर्थिक संकटात सापडला असून त्याला वीजबिल मध्ये सूट किंवा कर्जमाफी यावर विचार करणे सोडून सरकारने भलतेच उद्योग सध्या सुरू केल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

नैसर्गिक आपत्तीने आणि वाढलेली महागाई खतांच्या आणि औषधाच्या वाढलेल्या भरसाठ किंमती आणि त्यात कर्जबाजारी झालेले द्राक्षे उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वाईन उद्योगाला किंवा उद्योगपतीना आर्थिक फायद्यासाठी जर किराणा दुकान आणि सुपरमार्केट मधे जर वाईन विकायला परवानगी सरकार देत असेल तर शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शेतात गांजा अफू पिकविण्यास परवानगी द्यावी व विक्रीव्यवस्था बाजारपेठ निर्माण करावी.
अरविंद नाना बोरगुडे
( मा.सरपंच ग्रामपंचायत नैताळे रामपूर (निफाड)


सुपर मार्केट मध्ये जर वाइन विकण्याची परवानगी राज्य सरकार देत असेल तर शेतकऱ्याला सुधा शेतात गांजा पिकवण्याची परवानगी देण्यात यावी!.
किरण प्रदीप सोनवणे
युवा तालुका अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here