दक्षिण पश्चिम मौसमी पावसाचे अंदमान-निकोबार द्वीपसमुहात पावसाचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली.
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन वेळेस अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मे महिन्यातील तप्त तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. परंतु यंदा वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिलं. भंडारा तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांंचं मोठं नुकसान झालं आहे.
विदर्भातील परिसरात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे.कोकणात रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील बीडमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम