भाजपा कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी पिटाळून लावले

0
20

द पॉईंट प्रतिनिधी : सकाळी भाजपच्या वसंत स्मृती येथे शिवसैनिकांनी दगडफेक केल्यानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले, प्रतिक्रिया म्हणून भाजपाने शालीमार येथील शिवसेना शाखेवर दगडफेक करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते येत असताना त्यांना पोलीस आणि शिवसैनिकांनी पिटाळून लावले.

वर्दळीच्या शालीमार चौकात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे मोठ्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी जमले असून तणावपूर्ण शांतता याठिकाणी आहे.

दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समजते. दोन्हीही पक्षाच्या समर्थकांनी यावेळी मोठी घोषणाबाजी केली.

भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी यावेळी पळवून लावले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा नाशिकचे शिवसेना भवन फोडण्याचा डाव सेनेने हाणून पाडला. नगरसेवक मुकेश शहाणे यांची शिवसैनिकांना शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. शहरात बंदोबस्त असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here