पुरोगामी महाराष्ट्रात ‘प्रेमीयुगलाची’ आत्महत्या ; समाज अजून किती बळी घेणार ?

0
23

जळगाव प्रतिनिधी : प्रेमाचा तुजा रंग कसा ? का प्रश्न पुन्हा महाराष्ट्रला पडला आहे. जळगाव जिल्ह्यातील वाडे (ता. भडगाव) येथील माध्‍यमिक विद्यालयाच्‍या ओट्यावरील छताला एका प्रेमी युगलाने एकाच दोरीला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाने मध्‍यरात्री मोबाईलवर बाय असे स्‍टेटस ठेवून गळफास घेतला. सदर घटना सकाळी उघडकीस आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रेमींना घरच्यांचा विरोध होता की अन्य काही अडचण याबद्दल मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही.

वाडे येथील माध्यमिक विद्यालयात रात्री एक तरूण आणि तरूणीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे प्रेमी युगल असून विवाहाला समाज मान्यता देणार नाही. हा कयास त्यांनी बांधला व या भितीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. माध्यमिक विद्यालयातील पहिल्या मजल्यावर जिन्यावर जाऊन गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मुकेश कैलास सोनवणे (वय २२, रा. वाडे, ता. भडगाव) आणि तरूणी ही नेहा बापू ठाकरे (वय १९, रा. वाडे) असे या प्रेमी युगूलाचे नाव आहे. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांनी लक्ष दिले असते तर दोघांचे प्राण वाचले असते, मात्र समाज अजूनही प्रेमाला मान्यता देत नसल्याने नाहक बळी गेल्याचे चित्र आहे.

दोघेही एकाच समाजाचे मग अडचण कुठे ?

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह भडगाव पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा यातील तरूण हा मुकेश सोनवणे आणि तरूणी नेहा ठाकरे असल्याचे समजले. हे दोन्ही एकाच समाजाचे असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही जणांचे मृतदेह खाली उतरवून त्यांच्या पार्थिवाला शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. प्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील यांच्या खबरीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय सुशील सोनवणे करीत आहेत.

अजून किती बळी ?

समाज प्रेम विवाहाला मान्यता देत नसल्याने अनेक युवक युवती आत्महत्या करतायत, अथवा पळून जाऊन लग्न करताय, या घटना थांबवण्यासाठी समाजातील सुशिक्षित वर्गाने पुढे येन गरजेचं आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here