पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग वाढले

0
66

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे संकट वाढले आहे. मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे पूर्णतः कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा पावसाच्या इशाऱ्याने चिंता वाढवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हवामान खात्याने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

आधीच अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाच्या शेतमालावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाव खूपच खाली आले आहेत. बदलत्या ऋतुचक्रामुळे शेतकरी वर्गासमोर चिंता उभी केली आहे.

आलेल्या शेतमालापासून आर्थिक हातभार लागण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाच्या इशाऱ्याने पुन्हा चिंतेचे ढग पसरले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here