पालखी सोहळ्यासाठी पिंपरीत वाहतूक बदल; असा असेल पर्यायी मार्ग

0
28

प्रतिनिधी, पिंपरी

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त तळवडे वाहतूक विभागात रविवारपासून (१९ जून) बुधवारपर्यंत (२२ जून) वाहतुकीत बदल केलेल आहेत. त्यानुसार देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) ते परंडवाल चौक (देहुगाव) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. त्यासाठी पर्यायी रस्ता भक्‍ती-शक्‍ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅन बे चोक ते खंडेलवाल चौक, देहूगाव असा राहील. तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. त्यासाठी पर्यायी रस्ता तळवडे गावठाण-चिखली ते डायमंड चौक ते मोईगावमार्गे निघोजे एमआयडीसीकडे वाहने जातील. तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा येथून देहूगावला जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. पर्यायी रस्ता एचपी, चौकमार्गे इच्छित स्थळी वाहने जातील. परंडवाल चौक ते देहू कमान चौक ते खंडेलवाल चौक हा रस्ता व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. देहूकमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here