तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : नाशिक जिल्हा व कसमादे परिसर कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो . या भागातील शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी नोकरी मागे न लागता आपल्या शेतकरी बांधवांना शेत मालासाठी न्याय मिळावा यासाठी स्वतः व्यापारी होत भाजीपाला, कांदा ,डाळिंब या प्रकारचे मालाची खरेदी करून बाहेर राज्यात पाठवत आहेत परंतु बाहेर राज्यातून येणारे व्यापाऱ्यांकडून या नवीन व्यापाऱ्यांची फसवणूक घडल्याचे अनेक प्रकार नाशिक जिल्ह्यात यापूर्वी देखील झाले आहेत.
यातून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांना व्यापार बंद करावा लागला व आपली शेती विकून आपल्या शेतकरी बांधवांचे पैसे देण्याची वेळ आलेली होती. अशीच घटना ताहाराबाद येथील शेतकरी व कांदा व्यापारी सोबत झाली परंतु त्यानंतर झालेल्या मदतीमुळे फसवणूक झालेले आर्थिक नुकसान परत मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की , ताहाराबाद येथील प्रगतिशील युवा शेतकरी व कांदा व्यापारी सचिन पाटील यांनी कर्नाटक येथील कांदा व्यापारी सोबत कांद्याचा व्यापार केला. तेथील व्यापाऱ्याने यांच्याकडून सुरुवातीला व्यवहार रोखीने केल्याने त्यांच्यावर विश्वास बसला नंतर त्या व्यापाऱ्याने जवळपास पंचेचाळीस लाख रुपयांची रक्कम परत न करता ती अडकवून ठेवली त्यानंतर व्यापारी सचिन पाटील यांनी अडकलेली रक्कम परत मागितल्यावर समोरून रक्कम परत देण्यास नकार मिळाल्याने व्यापारी पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर सचिन पाटील यांनी थेट धुळे मतदार संघाचे खासदार व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. त्यानंतर जायखेडा पोलीस स्टेशन येथे फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी जायखेडा पोलीस निरीक्षक पारधी व त्यांची टीम ने 7 कर्नाटक येथे संबधीत व्यापारीला अटक करण्यासाठी काम केले. तसेच तेथे कार्यरत असलेले व मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी तेथील पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांच्या मदतीने सदर व्यापाऱ्यांना अटक करून जायखेडा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यानंतर पंचेचाळीस लाखातून एकोणचाळीस लाख रुपये कांदा व्यापारी सचिन पाटील यांना परत मिळाले व सहा लाख रुपये ची कायदेशीर हमी देखील मिळाली.
प्रगतीशील शेतकरी व तरुण कांदा व्यापारी यांचे झालेले लाखो रुपयांचे नुकसान मा.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री धुळे मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे ,नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील तसेच नाशिक जिल्ह्यांतील रहिवाशी व कर्नाटक येथे कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांच्या प्रयत्नातून कांदा व्यापारी यांना मदत झाल्याने मोठे आर्थिक नुकसान भरपाई झाली.
शेतकरी व कांदा व्यापारी यांना फसवणूक करणारे व्यापारीना यामुळे धाक निर्माण होणार आहे. याबाबत खासदार भामरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील ,प्रकाश निकम तसेच जायखेडा पोलीस निरीक्षक पारधी व त्यांच्या पोलिस टीम ने केलेल्या कामगिरी बद्दल शेतकरी व कांदा व्यापारी वर्गात कौतुक होत आहे.
मी शेतकरी व कांदा व्यापारी असून नोकरी न करता मी आपल्या शेतकरी बांधवांना चांगला बाजार भाव मिळावा म्हणून या व्यापार क्षेत्रात आहे. परंतु अशी व्यापारीकडूनच लाखो रूपयांची फसवणूक झाल्यास नवीन व्यापारी या क्षेत्रात येणार नाही. यामुळे शेतकरीना न्याय मिळणार नाही.
सचिन पाटील
(शेतकरी व कांदा व्यापारी ताहाराबाद/ नामपूर)
शेतकरी च्या शेत मालाला भाव मिळावा म्हणून शेतकरी मुल व्यापार क्षेत्रात उतरत आहेत. परंतु या नवीन युवा व्यापारीची होणारी फसवणूक बाहेर राज्यातील काही व्यापारी करत असतात त्यामुळे फसवणूक करणारे व्यापारीवर कड्क कारवाई शासन स्तरावरून झाली पाहिजे.
– योगेश भामरे
(प्रगतीशील शेतकरी – पिंगळवाडे)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम