पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला आता मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ…

0
19

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना ( PM Garib kalyan anna yojana) जाहीर करण्यात आली होती. कोरोणा काळाला सामोरे जाण्यासाठी गरजूंना मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे.

कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मार्च 2022 पर्यंत मोफत धान्य वाटण्यास मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्य योजनेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा NFSA अंतर्गत 80 कोटी शिधापत्रिका धारकांना सरकार मोफत रेशन पुरवते शिधा पत्रिका धारक शिधावाटप दुकानांमधून मिळणाऱ्या अनुदानित धान्या पेक्षा जास्त आहे.

शिधापत्रिका म्हणजे नेमकं काय :

२८ जानेवारी २०२१ रोजी एक नवीन शासन निर्णय आला. आणि निर्णयानुसार अपाद्र शिधा पत्रिका मोहीम नेमण्यात आली. आणि ही मोहीम मार्च पासून राबवण्यात आली आहे. या मोहिमेत अर्ज करणे बंधन कारक आहे. तुमच्या कडे असलेलं रेशन कार्डला अर्ज नमूद करणे गरजेचे आहे. जर शिधा पत्रिका अर्ज केला नाही तर लाभार्त्याचें रेशनकार्ड बंद करण्यात येऊ शकतो.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ किती व कोणाला मिळतो ?

केंद्र सरकारचे योजनेअंतर्गत भारतातील सुमारे 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना दरमहा 5 किलो अधिक धान्य ( गहू तांदूळ) दिले जाते.
देशातील ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका उपलब्ध आहेत त्यांनाच या योजनेअंतर्गत दरमहा पाच किलो अतिरिक्त रेशन त्यांच्या कोट्यातील रेशन सह मिळत आहे . पण ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

विक्रेते धान्य देण्यास नकार करत असतील तर अशाप्रकारे करा तक्रार :

जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन विक्रेते या योजनेअंतर्गत तुमच्या कोट्यात धान्य देण्यात नकार देत असतील तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल वर प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे यावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. शिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही NFSA वेबसाईट https://nfsa.go.in वर जाऊन मेल लिहून तक्रार नोंदवू शकता

 

हे ही वाचा : नाशिकच्या महिला सरपंचचा छळ ; जीवाला कंटाळून केली आत्महत्या…

नाशिकच्या महिला सरपंचचा छळ ; जीवाला कंटाळून केली आत्महत्या…

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महिलांवर अत्याचार हे पूर्वीपासून होतच आले आहेत. मात्र अजूनही या अत्याचारांना थांब मिळत नाही. असेच काही कृत्य नाशिक मध्ये घडले आहे. नाशिक मधील एका सरपंच महिलेने स्वतःच्या जीवाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द या गावात ही घटना घडली आहे. महिला सरपंचच्या भावाच्या तक्रारी नंतर आत्महते प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. तक्रारी नंतर सासरच्या तिघाही जणांना अटक करण्यात आलं आहे. सांगण्यात येत आहे की महिला सरपंचाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here