नाशिक रोड प्रतिनिधी : नाशिक येथील जय भवानीरोड परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तेथील स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांच्या घरा मागे असलेल्या मनपाच्या मोकळ्या जागेवर बिबट्या आढळून आला.
यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या सुमारास या बिबट्याला काही महिलांनी पाहिले असता त्यांनी ही संपूर्ण घडामोड आजूबाजूच्या नागरिकांना सांगून सावध केले. तसेच बिबट्या दिसल्यावर परिसरातील कुत्र्यांनी भुंकण्यास सुरूवात केल्याने त्या ठिकाणी गर्दी झाली होती.
काही वेळाने बिबट्या तिथून पसार झाला. या सर्व घटनेबद्दल वनविभागाला (Forest Department) माहिती देण्यात आली असून वनविभाग बिबट्याचा शोध घेत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम