द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात मागील तीन वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याने मांढरे यांनी नाशिककरांच्या मनात घर केले होते.
बुधवारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या बदलीची बातमी येऊन धडकताच, नाशिककरांमध्ये नाराजी पसरली होती. सुरज मांढरे यांनी कोरोना काळात जिल्ह्यात उत्कृष्ट नियोजन केले होते. ते नाशिककरांच्या सतत संपर्कात राहून सदोदित योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना नाशिककरांना करत होते.
दरम्यान, आता सुरज मांढरे यांच्या जागी वसई विरार महापालिकेचे आयुक्तपद भूषविलेले पी. गंगाधरण यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पूर्व जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे आता राज्याच्या शिक्षण विभागाचे आयुक्तपद सांभाळून कारभार बघतील. सुरज मांढरे हे नेहमीच एक उत्तम प्रशासक म्हणून स्मरणात राहतील, अशा भावना नाशिककर व्यक्त करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम