द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. शेतकऱ्यांना या वातावरण बदलाचा चांगलाच फटका बसत आहे. कांदा आणि इतर पिकांना देखील या अवकाळी पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी आता किती सहन करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आणि भाव देखील कमी मिळत असल्याने शेतकरी पार कर्जाच्या बोझ्याखाली अडकला आहे. शेतकऱ्यांना काय उपाय करावे याचे उत्तर मिळत नसल्याने तो आता हतबल झाला आहे. या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने काही शेतकऱ्यांनी आमच्याशी संवाद साधला तेव्हा खालील बाबी आमच्या पुढे आल्या त्या वाचूया:
शेतकरी बापू शिंदे म्हणतात – अवकाळी पावसाने कांद्यावर मावा, तुडतुड्या नावाचे किडे पडतात. तसेच त्यावर करपा असा रोग पडतो यामुळे कांद्याची पात पांढरी पडते. तसेच जमिनीत बुरशीजन्य आजार कांद्याला लागतो यामुळे कांद्याच्या पातीला पीळ पडतो. अवकाळी पावसाने उद्पादन क्षमता कमी झाली आहे. १०० क्विंटल कांदा लावला तर उद्पादन २५ क्विंटल होत. त्यामुळे उद्पादन खर्च आणि बाजारातील भाव यामध्ये मोठी दरी असल्याने आम्हाला भावापेक्षा उद्पादन खर्च जास्त येतो असे बाबू यांचे म्हणणे आहे. चेन लिंक नसल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तसेच ४५०० रुपये भाव असला तरी आम्हाला २२०० ते २५०० असा भाव मिळतो. खतांची गुणवत्ता देखील ढासळली आहे. काही खतांमध्ये कचखडी सापडत असल्याने आम्हाला कमी खत मिळत. त्यामुळे आम्ही सेंद्रिय खतांचा वापर करतो असे असे बाबू म्हणाले.
शेतकरी बी. एन. फंद पाटील – कांद्याला साधारण तीन हंगाम असतात. खरीप हंगाम जून-जुलै ऑगस्ट मध्ये असतो. रांगडा म्हणजेच रब्बी हंगाम सप्टेंबर, ऑकटोबर, ऑगस्ट मध्ये असतो आणि उन्हाळा हंगाम नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये असतो. वातावरण चांगले असेल तर या तिन्ही हंगामात अनुक्रमे आम्हाला कांद्याचे उद्पादन ८ टन, १० टन आणि १५ टन असे होते मात्र आता अवकाळी पाऊस पडल्याने हेच उद्पादन ३ टन, ७ टन आणि १० टन असे येऊन पोहोचले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे पीक नामशेष होण्याच्या वाटेवर आहे अशी धक्कादायक परिस्थिती त्यांनी आम्हाला सांगितली. अतिपाऊस बुरशीजन्य आजारांना निमंत्रण देतो तसेच कांद्यावर मर, पीळ रोग, फुलकिडे, बुरशीजन्य आजार पडतात. आम्हाला उद्पादन खर्च जास्त येत आहे तर बाजारात भाव कमी मिळत आहे. उद्पादन खर्च दुप्पट तर भाव कमी असा योग असल्याने शेतकरी आता शेती करायची कि नाही असा विचार करू लागला आहे.
डिझेल वाढ झाल्याने शेतकऱ्यांना जास्त खर्च सोसावा लागत आहे. किमान ठिंबक सिंचन, मोटर, शेतकऱ्यांचे अवजार यावर सरकारने वस्तू व सेवा कर कमी करावा यामुळे शेतकऱ्यांना त्या गोष्टी परवडतील असे त्यांनी सांगितले. जेव्हा उद्पादन खर्चाच्या तुलनेत बाजार भाव कमी मिळत आहे. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना गोडावून उपलब्ध करून द्यावे. वीज, खत आणि सरकारचे निर्यात धोरण सरकारने बरोबर आखले तर याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे ते म्हणाले.
बाजारात जर भाव ४५०० टन भाव असला तर सगळा कांदा हा त्याच भावाने विकला जात नाही काही टन कांदा २२०० टन. काही कांदा २३०० टन भावाने विकला जातो मात्र त्यादिवशी कांद्याला ४५०० टन भाव मिळाला असे म्हटले जाते मात्र काही निवडकच टन कांदा जास्त भावाने जातो उरलेला कांदा जास्त भावाने जात असल्याने शेतकऱ्यांचे तेव्हा नुकसान होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम