द्राक्ष बागायतदारांसाठीचा पुरक औषधे खते विक्रीवरील खर्च कपातीकडे प्राधान्य

0
48

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी पवार ,उपाध्यक्ष कैलास भोसले यांचा सत्कार करतांना नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसगार ,रवींद्र निमसे आदी

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ द्राक्ष उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करेल द्राक्षमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी औषधे खतांच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजन्याचा आपला मानस आहे. द्राक्ष बागांच्या काडी देठ माती परिक्षणाचा अहवाल त्वरित मिळावा याकरिता प्रयोगशाळा अद्ययावत केल्या जातील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मांजरी (पुणे) येथे संपन्न झाली यावेळी वर्षभराचा द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा व्यवस्थापक गौरी पवार यांनी वाचुन दाखविला

कैलास भोसले यती‌न कदम बाळासाहेब क्षीरसगार यांचेसह सांगली सोलापुर पुणे नाशिक विभागातील द्राक्ष बागायतदारांनी यावेळी विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त केले द्राक्ष बागायदार संघाच्या कार्याबाबत मावळते अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतातुन द्राक्ष बागायतदार संघाच्या विद्यमान व माजी पदाधिकारी यांचे अनमोल योगदान असल्याचे स्पष्ट केले भविष्यात द्राक्ष बागायतदार संघाचे कामकाज अधिक व्यापक होत राहिल बाजारपेठेकडे त्याहेतुने लक्ष देण्याची आवश्यकता विषद केली

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसगार यांनी आपल्या मनोगतातुन द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्याचा गौरव केला भविष्यात द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यकारिणीत महिलांना प्राधान्य देण्याचा विचार करण्याचा प्रस्तावही मांडला  द्राक्ष बागायतदार संघाच्या राज्य व चारही विभागांच्या पदाधिकार्यांची निवड याप्रसंगी घोषित करण्यात आली यावेळी नाशिक विभागाला कैलास भोसलेंच्या रुपाने राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे तर राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी सह्याद्री फार्मचे विलास शिंदे , अँड  रवींद्र बोराडे, सुरेश कळमकर, बबनराव भालेराव, किशोर निफाडे, शामराव शिरसाठ, भारत सोनवणे, पुरुषोत्तम बोरस्ते, रावसाहेब रायते , शशिकांत गाडे, संदिप ढिकले, उमेश नवले, भाऊसाहेब गवळी, विजय घुमरे, भाऊसाहेब भालेराव, यादव कावळे, राजेश जाधव, गणेश मोरे यांची निवड करण्यात आली.

तर द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागीय कार्यकारिणीत नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे मानद सचिवपदी बाळासाहेब गडाख विभागीय संचालक मंडळात दिनेश रकिबे अँड रामनाथ शिंदे, कैलास पाटील, नंदु पवार, ईश्वर महाले, नंदकुमार पानगव्हाणे, वैभव चौधरी, नंदु पडोळ, मनोहर थेटे, रोहिदास लांडगे, मोतीराम जाधव, सुनील बार्हाते, राजेंद्र भालेराव, संजय थेटे, संकेत गायकवाड , वैभव तासकर, सोपान बोराडे , अजित सानप,  योगेश कुशारे, अमोल गोडसे वाल्मिक सांगळे, दिगंबर कहांडळ, बाळासाहेब सरोदे, तानाजी सरोदे, आदींचा समावेश करण्यात आला आहे.

विभागीय संचालक ते उपाध्यक्ष….

कैलास भोसले यांच्या रुपाने नाशिक विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे द्राक्ष बागायतदार संघाच्या विभागीय संचालक पदापासुन प्रत्येक पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली या संधीचे भोसलेंनी द्राक्ष उत्पादकांसाठी सोने करुन दाखविले आहे, त्यातुन द्राक्ष उत्पादकांना एक नवी दिशा मिळाली आहे. भविष्यात द्राक्षाची विश्वासार्ह बाजारपेठेसह कमी खर्चीक द्राक्ष जाती उत्पादकांना उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here