द्राक्ष उत्पादकांना ड्रायपोर्टसाठी पाठपुरावा करणार- मंत्री भारती पवार

0
15

मुकुंद भडांगे प्रतिनिधी : केंद्र शासनाने दिलेल्या जबाबदारीचे पूर्णपणे पालन करून आरोग्याविषयी सर्व योजना तळागाळातील नागरिकांसाठी राबविणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खा. भारती पवार यांनी दिली त्या मंगळवार (दि.१७) जनआशीर्वाद यात्रेनिमित्त पिंपळगाव बसवंत येथे बोलत होत्या.

पुढे बोलताना खा. पवार बोलल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोरोना काळातील कार्य हे मोठे असून या काळात देशातील नागरिकांच्या आरोग्याविषयी अधिक लक्ष देण्यात आले. तसेच तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांविषयी महत्वाचा असलेला ड्रायपोर्टचा पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मतदार संघातील मतदारांनी आजपर्यंत पाठिंबा दिला असून यापुढेही हे मतदार असाच पाठिंबा देतील अशी अपेक्षा व्यक्त करत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जनतेने आशीर्वाद देण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून कार्य केलेल्या सर्व डॉक्टर, सेविका, कर्मचारी, आशा सेविका, उज्ज्वल योजनेचे लाभार्थी, किसान योजनेचे लाभार्थी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी यावेळी आ.संजय केळकर, प्रदेश आदिवासी अध्यक्ष आमदार डॉ.अशोक ऊईके, जिल्हाध्यक्ष केंदा आहेर, बापूसाहेब पाटील, भागवत बोरस्ते, सतीश मोरे, अल्पेश पारख, प्रशांत घोडके, गोविंद कुशारे, अशोक मोरे, किशोर कापसे, योगेश लावर, चेतन मोरे, योगेश कायस्थ, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, मंडळधिकारी नीलकंठ उगले, तलाठी अभिषेक पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here