देवळा ‘ॲग्रो’ कंपनीचे ‘मुलकन’ कांदा बियाण्याचा उतार प्रभावी

1
48

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; ‘देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी’ निर्मितीचे ‘मुलकन’ कांदा बियानाणे उत्तम उतार दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .

लोहोणेर ता देवळा येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब बच्छाव यांच्या शेतातील या बियाणे प्लॉटची देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन केदा (नाना) आहेर यांनी पाहणी केली. यावेळी देवळा ॲग्रो निर्मित ‘मुलकन’या कांदा वाणाच्या बियाणाने उत्तम उतार दिल्याची माहिती लोहोणेर येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब बच्छाव यांनी दिली. केदा नाना आहेर यांनी मातोश्री स्व मुलकनबाई आहेर यांच्या नावाने

‘मुलकन’ कांदा बियानाची त्यांनी आपल्या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून निर्मिती केली असून , या बियानाची हातोहात विक्री झाली आहे . विक्री केलेल्या बियानाची आहेर हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाणे उताराची पाहणी करीत असून बियानाला उत्तम उतार मिळत असल्याने त्यांनी व संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले . कसमादे परिसरात नगदी पीक म्हणून कांदा पीकाची ओळख झाली असून , मध्यंतरी या परिसरातील शेतकऱ्यांची कांदा बियानात फसवणूक झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला गेला होता. शेतकरी पुत्र व कष्टकरी शेतकऱ्यांची जाण असलेल्या केदा आहेरांनी यांनी याची जाणीव लक्षात घेऊन देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ‘मूलकन’ या नावाने कांदा बियानाची निर्मिती केली, व याला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत ते खरेदी केले. आणि त्याला उतार देखील उत्तम मिळाल्याने त्यांनी आत्मिक समाधान लाभले व यातून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती दिली.

उपस्थित शेतकऱ्यांनी देखील बियानाची विश्वासार्हता वाढताना दिसत असल्याची कबुली दिली. यापुढे आपण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेणार असून, शेतकरी सुखी तर जग सुखी यासाठी देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी’ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी आहेर यांनी सांगितले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here