सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने देवळा पाच कंदिलवर टोमॅटो ओतून संताप व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की , सध्या बाजारात भाजीपाला वर्गीय पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शेतकऱ्यांनी कोबी पिकावर रोटर फिरवला तर ट्रक भर वांगी फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच आज (दि 1) रोजी मकरंदवाडी ता देवळा येथील दिनकर खैर ह्या शेतकऱ्याने रात्री ९ वाजता मार्केट मध्ये विक्री न झालेला टोमॅटो पाच कंदीलवर आणून ओतून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या .
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे . मात्र , टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने खर्च देखील वसूल होणार नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे गॅस सिलेंडर बरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या भावात भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. या दुहेरी तिहेरी संकटात शेतकरी वर्गसापडला असून, शासनाने याची दखल घेऊन भाजीपाला वर्गीय पिके हमी भावाने खरेदी करून दिलासा द्यावा ,अशी मागणी करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम