देवळा पंचायत समितीत राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा

0
11
देवळा येथे भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव आदी (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला .

देवळा येथे भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव आदी छाया सोमनाथ जगताप

तालुक्यातील सर्वच जि प व माध्यमिक शाळेत गुरुवारी भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय शिक्षण साजरा करण्यात आला . देवळा येथे कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, केंद्र प्रमुख रावबा मोरे, वरीष्ठ सहाय्यक अमोल जाधव, कनिष्ठ सहाय्यक निशा देसले, शीतल महाजन उपस्थित होते.


हे ही वाचा

द पॉईंट नाऊ ; देवळा नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उद्या (दि १२ ).रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली . जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या निफाड , पेठ , सुरगाणा , कळवण , देवळा व दिंडोरी या नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे . माहे एप्रिल २०२० ते मे २०२१ मध्ये मुदत संपलेल्या एकूण ०६ नगरपंचायतींमध्ये ना.मा.प्र . च्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० % च्या वर जात असल्यामुळे या नगरपंचायतींसाठी नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२१ अन्वये जाहीर झाला आहे . शुक्रवारी दि १२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे .याकरिता उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे . देवळा नगरपंचायत करिता येवला येथील उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे . याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रक संबंधित मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here