नाशिक: देवळा तालुक्यात असलेल्या मेशी परिसरात वादळी वार्यासह अचानक पडलेल्या अवेळी पावसामुळे शेतकर्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर शेतात काढणी केलेला कांदाही पूर्णपणे भिजल्याने शेतकरी हतबल झाले आहेत..
मेशीसह परिसरातील निंबोळा, महालपाटणे, देवपूरपाडे, रणादेवपाडे, वासुळ तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बेमोसमी पावसामुळे शेतकर्यांची पळताभुई थोडी झाली. गेल्या महिन्यातील पावसामुळे झालेला करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि विजेचे भारनियमन स
यामुळे कांद्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तर आता कांदा काढणीच्या वेळी मजूर टंचाईला देखील शेतकर्यांना तोंड द्यावे लागले.
अनेक शेतकर्यांनी कशीबशी मजुरांची जुळवाजुळव करून कांदा काढणी केली होती तर काहींचा कांदा काढणी योग्य झाला असताना काल अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणी केलेला कांदा (Onion) झाकण्यासही शेतकर्यांना वेळ मिळाला नाही. जेमतेम हाताशी आलेला कांदा भिजल्याने शेतकरी आर्थिक तसेच मानसिक संकटात बुडाले आहेत. हवामान विभागातर्फे पुढे दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम