देवळा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा येथे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने (सन 2021-22 ) या खरीप पणन हंगाम आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीचा शुंभारभ तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
या योजनेंतर्गत येथील खरेदी विक्री संघात संघात विक्रीसाठी आलेल्या मका रु 1870/- व बाजरी या भरडधान्याची रू 2250/-प्रमाणे आधारभूत किमती प्रमाणे खरेदी केली जाणार आहे . याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले .
किमान आधारभूत किंमत ही भारतातल्या केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी निर्धारीत करण्यात येत असलेली पिकांची/धान्यांची अथवा शेत उत्पादनांची किंमत असते.त्यानुसार सरकार हे शेतकऱ्यांकडून धान्यखरेदी करते. हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रीमंडळ घेत असते.
कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोग अशा वाढीबाबत आपली शिफारस केंद्र सरकारला सादर करीत असते. त्या शिफारसीनुसार केंद्रीय मंत्रीमंडळ आपला निर्णय जाहिर करते. या संबंधीची तरतूद त्या-त्या वर्षाच्या अर्थसंकल्पात पूर्वीच करण्यात आलेली असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणारा त्या धान्याचा भाव, मागील वर्षीचा खरेदी भाव, मागणी व पुरवठा, साधारणतः पेरणीचे क्षेत्र आदी अनेक गोष्टींवर ही किंमत ठरविली जात असते.
योजनेच्या शुभारंभा प्रसंगी सहायक निबंधक सुजय पोटे , पुरवठा अधिकारी सुभाष भामरे ,रोहित उशिरे ,पडवळकर ,चेअरमन चिंतामण आहेर ,व्हा चेअरमन संजय गायकवाड ,संचालक योगेश आहेर सुनिल देवरे ,अतुल आहेर , महेंद्र आहेर , सुनील देवरे ,नारायण जाधव ,किरण आहेर , सचिव माणिक निकम ,व्यवस्थापक गोरख आहेर आदींसह शेतकरी संजय साळवे , बाळासाहेब मगर ,सुनंदा आहेर आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम