देवळा ; देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मंगळवार (दि २६) एप्रिल रोजी दुपारी १ वाजता शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती सभापती केदा आहेर यांनी दिली .
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतक – यांचे हित डोळ्यासमोर कामकाज सुरु आहे .बाजरी समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डाळींब , टोमॅटो आदी भाजीपाला खरेदी विक्री सौदे लिलाव सुरू केलेले आहेत . या शेतकरी मेळाव्यामध्ये देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांसह राष्ट्रीय कृषि बाजार ( ई – नाम ) , देशामध्ये नवीन १० हजार एफ पी . ओ . , स्थापनेचा लक्ष्यांक आणि कृषि पणन योजना याची माहिती दिली जाणार आहे . तरी शेतकऱ्यांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन सभापती केदा आहेर ,सचिव माणिक निकम व संचालक मंडळाने केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम