कृषी प्रतिनिधी : दहा वर्षांपूर्वी कांदा विक्रीला मिळत होता, तोच दर आजही मिळत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांना दहा वर्षांपूर्वी व आजही दहा रुपये किलो अशाच दराने कांदा खरेदी करत आहे. दुसरीकडे मात्र उत्पादन खर्च तीन पटीने वाढला आहे. तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पन्न मिळत असल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
संगमनेर तालुक्यात यंदा सुमारे ११ हजार हेक्टर उन्हाळी कांद्याची लागवड झाली असून, सध्या कांदा काढणीची शेतकरी वर्गाची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना विक्रीचा दर परवडत नसल्याने कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे कल वाढला आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, दहा वर्षांपूर्वी कांदा विक्रीचा दर दहा ते बारा रुपये होता, तोच दर आजही मिळत आहे. मात्र, दहा वर्षांत उत्पादन खर्चात तीन पटीने वाढ झाली आहे.
त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याचा विक्रीदर वाढला नाही. उलट निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.
पूर्वी एकरी २५० ते ३०० क्विंटल उत्पादन निघत होते. आज ते उत्पादन केवळ १५० ते २०० क्विंटलवरच थांबले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खर्च वाढला भाव मात्र जैसे थे
दहा वर्षांपूर्वी कांद्याला एकरी वर्च २० ते २१ हजारांपर्यंत येत होता, तोच स्वर्च आज ७५ ते ८० हजारांपर्यंत येत आहे व कांदा विक्री दरात त्या पटीत वाढ झाली नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. रासायनिक स्वते, कीटकनाशक यांच्या किमती दुप्पट-तिप्पट होत गंगनाला भिडल्या आहेत. शेतीची मशागत, शेतमाल वाहतूक महागले आहे. मात्र, शेतमालाचा भाव जैसे थे आहे.
आज कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. सरकारने नाफेडमार्फत किमान ३० रुपये किलोने कांदा खरेदी करावा, अशी मागणी होत असताना नाफेडने मात्र ११ ते १२ रुपये किलोने कांदा खरेदी सुरू करून शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी निराधार केले आहे. कांदा खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने किमान तीस रुपये किलोने कांदा खरेदी करण्यासाठी नाफेडला आदेश द्यावा. -राहुल कान्होरे, युवक जिल्हाध्यक्ष, •• महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना.
सरकारने सर्व शेतमालाला हमीभाव देणे गरजेचे आहे. शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे दर दुप्पट, तिप्पटीने वाढले आहेत. मात्र, शेतमालाच्या भावात वाढ झाली नाही. आज शेती तोट्यात आहे. -सावळेराम गांडेकर, प्रगतिशील शेतकरी, बोरबन.
कांदा लागवडीपासून ते विक्रीपर्यंत एकरी खर्च
दहा वर्षांपूर्वीचा
कांदा बी
शेणस्वत (३ ट्रॉली)
नांगरणी (तासी)
कांदा लागवड
फवारणी (३ वेळा)
रखते
खुरपणी
कांदा काढणी
कांदा गोण
वाहतूक एक गोण (१५० कि.मी.साठी)
एकरी खर्च
स्वर्च (रुपये)
३ हजार
६ हजार
३०० ते ४०० रुपये
७ ते ८ हजार
अडीच ते तीन हजार
४ हजार
२ हजार
५ हजार ते ७ हजार
७ ते १० रु.
80 हजारापर्यंत
आजचा खर्च (रुपये)
९ ते १० हजार
१५ हजार
१ हजार
१३ हजार
८ ते १० हजार
१२ हजार
५ हजार
१५ हजार
३८ ते ४० रु.
१०० ते ११० रु.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम