द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : दरेगाव ता.चांदवड येथे नाशिक येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाअंतर्गत ‘निंबोळी अर्क फवारणीचा वापर व उपयुक्तता’ याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कडुनिंबाच्या झाडामध्ये असलेले अझ्याडिरॅक्टीन कीटकनाशकांचे काम करते. निंबोळी पासून तयार केलेल्या या अर्कामुळे मावा, तुडतुडे,अमेरिकन बोंड आळी, पाने कुरतडणाऱ्या अळ्या,फळ माशा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो. निंबोळी अर्काची फवारणी ही रासायनिक कीटकनाशकासारखी हानीकारक नाही.पिकांसाठी फायदेशीर असते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फवारणीचा वापर शेतीसाठी करावा असे कृषिदूत कुणाल खैरनार यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आए.बी.चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.बी.सातपुते, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी. देशमुख,कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रा.डी.एस.शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम