पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरात बराच ठिकाणी हाॅटेल्स, बार मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या हुक्का पार्ट्यां व सुरू असतात. यामुळे गुन्हेगारीला आधार मिळतो तर असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
रमझान ईदच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्या पासून ही कारवाई सुरू करण्यात आली. तर १ मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिनानिमित्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोरोनानंतर निर्बंध लावून देखील हॉटेल आणि बार रेस्टॉरंट, हुक्का पार्लर सुरू आहेत. परंतु मध्ये पुण्यातील तरुणाईमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हा गाडीला देखील वाव मिळत आहे. पार्ला बार यांना दिलेल्या वेळात दुकान बंद केल्याने त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
या सर्व गोष्टीना नियंत्रणात ठेवण्याचे काम सामाजिक सुरक्षा विभागास पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हाॅटेल्स, बारवर तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागास नुकतेच पुणे पोलीस दलात हजर झालेले दहा परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी सेलचे अधिकारी व स्टाफही देण्यात आले. धनकवडी येथील सरस्वती कॉम्प्लेक्स मधील ‘कॅफे सायक्लोन’ मध्ये पहाटे ०२.२० वा. च्या सुमारास अवैध रित्या हुक्का बार चालू होते. त्याठिकाणी कारवाई करण्यात आली असून कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम