भूषण चोभे
नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला गायनॅकॉलॉजि यात शिकाऊ डॉक्टर म्हणून कार्यरत होता त्याचा मृतदेह महाविद्यालयातील वॉशबेसिन मध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
मृत्यू संशयस्पद झाल्याचे समजले म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषीवर कठोर कारवाई करावी व मृत डॉ स्वप्निल शिंदे याला न्याय द्यावा. अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेना शिवसेना यांच्या वतीने दि १८ रोजी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनास केली.
यावेळी डिन डाॅ मृणाल पाटिल यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी डाॅ.पाटिल यांनी चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भा.वि.से जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, महानगर प्रमुख श्रीकांत मगर, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल जाधव, महानगर चिटनिस रितेश साळवे, उपमहानगर प्रमुख राहुल सानप, विभाग प्रमुख युवराज जाधव उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम