प्रवीण आहेर
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. साधा उत्पादनखर्चही मिळून येत नाही यामुळे शेतकरी वर्गाची परिस्थिती भयावह झाल्याची दिसते. मार्केटमध्ये(market) टोमॅटो भाड्याने गाडी करून घेऊन जाणे इतका सुद्धा खर्च मिळत नसल्यामुळे कळवण देवळा रस्त्यावर मटाने परिसरात साधारण दोन किलोमीटरपर्यंत टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलेला अवस्थेत आढळला.
शेतकरीवर्ग कोणतेही पीक घेत असताना पिकाबरोबर चार पैसे मिळतील असे स्वप्न बघत पिकाचे उत्पादन घेत असतो परंतु त्याला चार पैसे पदरात पडतील या आशेवरच अवलंबून राहावे लागते. शेतमालाचे भाव आज मोठ्या प्रमाणावर गडाडले असून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. टोमॅटोची अवस्था पूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी कळवण देवळा(Deola)रस्त्यावरील मटाने परिसरात दोन किलोमीटर पर्यंत रात्री रस्त्यावर टोमॅटोचा रीघ अज्ञात शेतकऱ्याने फेकून दिलेल्या अवस्थेत दिसून आला.
बळीराजाला साधे आपल्या पिकाची नासाडी सरकारला दाखवता आले नाही सरळ रस्त्यावर रात्री चोरून फेकावे लागले. कारण मार्केटमध्ये एकवीस रुपये कॅरेट भाव टोमॅटोला मिळत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हा टोमॅटो रस्त्याने फेकला असल्याचा प्राथमिक अंदाज शेतकरी वर्गाकडून लावला जात आहे.
टोमॅटो(tomato) या पिकास जुगारी पीक म्हणून ओळखले जाते मागील वर्षाच्या तुलनेत इतर पिकांना फाटा देत शेतकत्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली. नैसर्गिक संकट, रोग, कोरोणाचे सावट असताना देखील उत्पादन घेतले परंतु यावर्षी एवढा मोठा जुगार झाला की उत्पादन खर्चही निघेना. टोमॅटोचे रोपे विकत घेण्यापासून ते बाजारात नेई पर्यंत लाखो रुपये खर्च करावा लागतो. इतका खर्च करूनही मात्र आज शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे. काही दिवसांपूर्वी तीनशे रुपये कॅरेट जाणारे आज तीस रुपये इतका मातीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा वेळ सध्या कोणालाच नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत केंद्रीय कृषिमंत्र्यांना याबाबत अस्वस्थ केले. केंद्र सरकारने धोरणही जाहीर केले मात्र राज्य सरकारांनी याबाबत केंद्राकडे मागणी करणे आवश्यक असल्याचं कळविले. मात्र ही मागणी कधी होईल याबाबत आणि कधी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल याबाबत अजून कोणतीही शाश्वती नाही.
कारण राजकीय(Political)वर्तुळात उलट्या दिशेने वारे वाहताना दिसत आहे. टोमॅटो पिकासाठी योग्य धोरण ठरवत, शेजारील देशातील मागणी लक्षात घेऊन निर्यात करावी, टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी विशेष योजना राबवत प्रोत्साहन देणे अश्या काही उपाययोजना करत योग्य हमीभाव मिळावा हीच एक माफक अपेक्षा बळीराजाची आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम