जगाचा पोशिंदा संकटात ; विठेवाडीत ट्रकभर वांगी रस्त्यावर

0
38
विठेवाडी ता. देवळा येथील शेतकरी राजेंद्र देवरे यांनी वांग्याला भाव नसल्याने असे फेकून दिले आहेत .(छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कसमादे भागातील शेतकरी हा कायम नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आघाडीवर असतो , शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते . पीक पिकवण्यात यशस्वी होतो मात्र सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे आलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागतो किंवा, फेकावा लागतो.

गेल्या वर्षी

विठेवाडी ता देवळा येथील शेतकरी राजेंद्र देवरे यांनी वांग्याला भाव नसल्याने असे फेकून दिले आहेत छाया सोमनाथ जगताप

कोबी , मिरची ,टोमॅटो , वांगी या पिकांना बऱ्यापैकी दर मिळाला होता . सहाजिकच या वर्षीही शेतकऱ्यांनी वरील प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे . मागील पंधरवाड्यात टोमॅटो, कोबी, वांगी , मिरची या वांनाना बऱ्यापैकी दर मिळत होते .दहा बारा रूपये का होईना भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तरी पदरात पडत होता , मात्र मागच्या आठवड्यापासून कोबी,फ्लॉवर टोमॅटो, वांगी यांचे भाव चार, पाच रूपयांपेक्षा कमी दराने विक्री होत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे , विठेवाडी ता देवळा येथील तरूण शेतकऱी राजेंद्र धनाजी देवरे यांनी दोन एकर क्षेत्रात देशी रैवया जातीच्या काळ्या वानाच्या वांग्याची लागवड केली आहे , त्यासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्रा करीता ठीबक,पाइप,मल्चींग पेपर, यासाठी ४८,००० हजार रुपये खर्च करून, सुरवातीलाच दोन ट्रक शेनखत , रोपं , मशागत या साठी ५०,००० रुपये खर्च करून लागवड केली आहे,तिन महिन्यात अनेक वेळा रासायनिक खते , जैविक खते , मजुरी, दर आठवड्याला फवारणी यासाठी ४५००० रूपये असा एकूण १लाख ५० रुपये हजार खर्च केला आहे . तिन महिन्याच्या मेहनती नंतर सुरूवातीला पहिल्या एक दोन तोडणीला सुरत मार्केटला ४०० ते ४५० पर जाळी दर मिळाला खर्च वजा जाता ३०० रूपये दर मिळाला .

परंतु एक आठवडा उलटल्यावर मोठ्या प्रमाणात वांगी निघाली संपूर्ण ट्कर भर वांगी तोडुन सुरत मार्केटला पाठवले. यात काही जाळ्या १६० रुपये प्रति जाळी प्रमाणे विक्री झाली. ६० रूपये तोडणी वाहतूक वजा जाता १०० रुपये भाव मिळाला बाकीचे वांगी कवडीमोल भावात देखील न घेतल्याने फेकून ध्यावी लागली .मागिल आठवड्यात एक ट्रक वांगी तोंडुन नदी काठावर फेकुन दिली अशी माहिती शेतकरी रांजेद्र देवरे यांनी अतीशय उदीग्न्न होत सांगितले .

कसमादेचा शेतकरी स्वतः शेतात राबून मोठ्या कष्टाने शेती पुलवतो, फळं, भाजीपाला ,पिकवतो त्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोबी ,फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, मिरची इत्यादी पिकांची लागवड करून शहरातील जनतेला ताजा भाजीपाला पाठवतो. मात्र बाजारात दाखल झाल्यानंतर मात्र व्यापारी कवडीमोल भाव देऊन त्याची लुट केली जाते ,यावर कोणाचेच नियंत्रण नसते , खर्चा रूपया मिला चार अना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे . कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here