वैभव पगार
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहरातील नागरीक जीएसटी, नोटबंदी, कोरोना लॉकडाऊन ह्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असतांना शहरातील 850 चौ फूट पर्यंतच्या घरांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल घिया यांनी केली आहे.
दिनांक 22 फेब्रुवारी 2022 रोजी नाशिक मनपाच्या आयुक्तांना शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील यांच्या नेतृत्वात आप ने दिलेल्या मागणीपत्रानुसार नाशिक मधील रहिवासी घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यासंदर्भात मनपा आयुक्तांना कळवलेले असून देखील त्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन वा निर्णय न घेण्यात आल्यामुळे काल दिनांक 6 मार्च (रविवार) पासून जुने सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घिया यांनी त्यांच्या घरी *बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह* सुरू केलेले असून सदर आंदोलनास विविध समाजघटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या हे प्रकरण सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सविस्तर असे की नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी घरपट्टी व पाणीपट्टी यांचे दर अत्यंत जास्त आहेत त्यामानाने नाशिक महानगरपालिका तर्फे देण्यात येणाऱ्या नागरी सुविधा या अत्यंत थोड्या व कमी दर्जाच्या आहेत. नाशिक महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यंत वाढलेले आहे, असे अनेक राजकीय,सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितलेले आहे.
नाशिक मनपाच्या अर्थसंकल्पापैकी जवळ जवळ 40 ते 50 टक्के पैसा हा राजकीय नेते,कंत्राटदार, अधिकारी आणि गुंड यांच्या साखळी मध्ये आपापसात वाटून घेतला जातो.ह्या पैशांचा भ्रष्टाचार होतो.हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबल्यास एकूण अर्थसंकल्पाचे अंदाजे 10 टक्के पेक्षाही कमी रक्कम असलेली मनपा क्षेत्रातील रहिवासी घरपट्टी (850 चौ फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ)व पाणीपट्टी (20,000 लिटर प्रतिकुटुंब) कायमस्वरूपी माफ करून नाशिकच्या नागरिकांना चांगला दिलासा देता येऊ शकतो. अनेकदा अशा प्रकारची मागणी मनपा कडे करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
या आंदोलनाला अनेक सामाजिक, पर्यावरण, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व व्यक्तींच्या संघटना यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
घरपट्टी व पाणीपट्टी माफीच्या आंदोलनात सर्वसामान्य नाशिककरांनी सहभागी होण्याचे आवाहन शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ऍड प्रभाकर वायचळे, युवाध्यक्ष योगेश कापसे,विनायक येवले, चंदन पवार, एकनाथ सावळे, अनिल कौशिक, दिपक सरोदे, चंद्रकांत महानुभाव, नितीन भागवत, युवा आघाडीचे अभिजीत गोसावी, महिला आघाडीच्या प्रमोदिनी चव्हाण, मंजुषा जगताप, अल्पसंख्यांक आघाडीचे अल्ताफ शेख, माजिद पठाण, फारुख शेख , यांनी केले आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम