गिरीश महाजन यांच्या चिंतेत वाढ

0
67

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शहरातील शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आमदार गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे एकुण सात ते आठ हजार लोकांचा जमाव जमला होता.

दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून मोर्चाचे आयोजन करणाऱ्या भाजपचे आमदार गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी , खासदार उन्मेष पाटील ,खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुलाल पटेल, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदीलकर हे करीत आहेत याप्रकरणात आता पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here