गारपिटीच्या इशाऱ्याने ‘खानदेश-विदर्भातील’ शेतकऱ्यांचे अश्रू अनावर

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अवकाळी पाऊस अन गारपिटीच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे, देशातील वेगवेगळया राज्यांत पडणाऱ्या पावसामुळे कडाक्याची थंडीदेखील येणाऱ्या काही दिवसांत वाढणार आहे. त्यामुळे नाशिकसह खानदेशातील शेतकरी उरले सुरले पिक हातातून जाण्याच्या भीतीने चिंतेत सापडले आहे

राज्यात हवामान बदलल्याने मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणात (Kokan) पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर तर खानदेश (Khandesh) आणि विदर्भात (Vidarbha) गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज (दि २२) महाराष्ट्रात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण . पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान राहील अशी शक्यता वर्तविली आहे.

पुढील 24 तासानंतर राज्यात किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू घसरण अपेक्षित असल्याचेही या अंदाजात व्यक्त करण्यात आले आहे. डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. याचा फटका शेतकऱ्याला बसला होता.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here