खेलदरी आश्रमशाळेत ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ कार्यक्रम संपन्न

0
54

चांदवड प्रतिनिधी : श्री चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्था चांदवड संचलित स्व.मा.आ.जयचंद दिपचंद कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खेलदरी ता. चांदवड जि. नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एल.जी.इलेक्ट्रॉनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने “फिरती विज्ञान प्रयोगशाळा”हा कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांच्या सहभागाने विज्ञानाचे विविध प्रयोग करून दाखवण्यात आले.तसेच विज्ञान नाट्यछटिकेचे सादरीकरण करण्यात आले.विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात सहभाग घेतलेले पुणे विद्यापीठ येथील कर्मचारी श्री नंदराज कोळेकर,श्री सीताराम बहिर,श्री गणेश सोनवणे,श्री निशांत जगताप,श्री आकाश गायगवळी,श्री सोमनाथ मुर्तडक श्री अंकुश लांडे यांचा शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वितेसाठी माध्य.मुख्या.श्री सरगर बी.एस. अधीक्षक श्री काळे सर व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here