द पॉईंट नाऊ ब्युरो : तिरुपती बालाजी हे देवस्थान संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. याच तिरुपती बालाजीला जाऊन श्रद्धेने आपले केस दान करण्याची एक प्रथाच बनली आहे. याच दान होणाऱ्या केसांच्या विक्रीतून तिरुपती बालाजी देवस्थानाला तब्बल 126 कोटी रुपायांची कमाई झाली आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान हे मोठ्या प्रमाणावर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे भाविक येथे जाऊन आपले केस दान करतात. या केसांच्याच विक्रीतून 126 कोटी रुपये आणि लाडूच्या प्रसादातून 365 कोटी रुपये देवस्थानाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. यापुढील 2022-23 या वर्षात 3000 कोटींहून अधिक कमाईचा अंदाज मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेटी देत असतात आणि आपले केस दान करतात. यातूनच मंदिर प्रशासनाला कोट्यवधी रुपयांची कमाई होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम