कृषीसेवा केंद्राकडून वसुली साठी चक्क पाठवले गुंड ; शेतकरी संतप्त

0
63

नाशिक प्रतिनिधी : शेतकऱ्यांकडून उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी चक्क गुंडांच्या टोळीला सुपारी दिल्याची घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. खतं, औषधांच्या उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडून भाडोत्री गुंडांचा वापर करून उधारी वसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकीचे फोन, अश्लील शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी दिल्याची घटना निफाड तालुक्यातील उगावमध्ये समोर आली आहे.

हा धक्कादायक प्रकार कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातचं समोर आल्याने कायद्याचा धाक उरलाय का हा प्रश्न उपस्थित राहिलाय, शेतकरी दहशतीत उधारी वसुलीसाठी भाडोत्री गुंडांचा वापर करणाऱ्या कृषी सेवा केंद्राच्या महिला मालकाला राज्यसरकारचा यंदाचा शेती मित्र पुरस्कार जाहीर झालाय, शेतकऱ्यांना धमकवणारे शेती मित्र कसे? असा प्रश्न उपस्थित राहतोय.

शेतकऱ्यांकडून थकीत उधारी वसूल करण्यासाठी चक्क गुंडांच्या टोळीला सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांचे खतं आणि औषधांचे थकीत पैसे वसूल करण्यासाठी उगावमधील कृषी सेवा केंद्र मालकाने चक्क गुंडांचा वापर केलाय,पैसे अदा करण्यासाठी गुंडांकरवी धमकी देण्यात आली, अश्लील शिवीगाळ करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे एका शेतकऱ्याला क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचं सांगत पैसे दिले नाही तर गुंडांच्या टोळीकडे हे प्रकरण जाईल, वकिलांचीही गय केली जाणार नाही, अशी धमकवण्यात आलं, तर दुसऱ्या शेतकऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाणीची धमकी देण्यात आली.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. संतापजनक बाब म्हणजे उधारी वसुलीसाठी गुंडांचा वापर करणाऱ्या कृषी सेवा केंद्राच्या महिला मालकाला राज्यसरकारचा यंदाचा शेती मित्र पुरस्कार जाहीर झालाय. उधारी वसुलीसाठी कृषी सेवा केंद्राकडून अशा प्रकारे भाडोत्री गुंडांचा वापर केला जात असल्याचा बहुधा हा राज्यातला पहिलाच प्रकार असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय. दरम्यान या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणाऱ्या एकाला अटक करण्यात आलीय.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here