कुकूटपालन आता प्राथमिक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. पशुपालनात कुक्कुटपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी तसेच भूमिहीन शेतकरी करताना दिसतात.आता बहुतांशी शेतकरी व्यावसायिक दृष्ट्या कुकूटपालन करू लागले आहेत. ब्लड फ्लो पासून आपल्या कोंबड्यांना रोखण्यासाठी पूरक अशी माहिती उपलब्ध आहे.
अनेक पशुपालक शेतकरी शेतातच पोल्ट्री फार्म उघडून आपले उत्पन्न वाढविण्याकरता या व्यवसायाची निवड करतात कुकुट पालनासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य देखील पुरवले जाते. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक कोंबडीफार्म उभारण्यासाठी शासनाकडून लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो.
आज पोल्ट्री फार्म हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांमध्ये गणला जातो. अशा परिस्थितीत कोंबड्यांना लक्ष देणे व त्यांची जबाबदारी हाताळणे खूप महत्त्वाचे असते. पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू हा एक गंभीर आजार आहे. हा रोग खूप वेगाने पसरतो. कोंबडी फार्म मध्ये या रोगाचा शिरकाव झाला तर संपूर्ण पोल्ट्री फार्म नष्ट होऊ शकतो.बर्ड फ्लू हा रोग आल्यास याचा प्रसार रोखण्यासाठी दरवर्षी लाखो कोंबड्या मारल्या जातात.
शेतकऱ्यांना पशुपालक व कुक्कुटपालन व्यवसायात बर्ड फ्लू बाबत जागरुक राहणे गरजेचे आहे जेणे करून त्याला वेळीच प्रतिबंध करता येईल. या आजाराची लक्षणे पशूंमध्ये अशाप्रकारे दिसतात. बाधित पक्ष्यांची पिसे गळायला लागतात, त्यांना ताप येऊ लागतो. बाधित पक्ष्यांच्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त होते आणि संसर्ग वाढल्यास पीडित पक्षी मरण देखील पावतो. बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्यांमध्ये डोळ्याभोवती, मानेला तसेच डोक्याभोवती सूज, पायांवर निळसर छटा उमटणे,
अचानक पिसांची गळती, काहीच न खाणं, पक्ष्यांच्या शरीरात थकवा आणि सुस्ती येणे यामुळे पक्ष्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. याकरता शेतकऱ्यांनी संपूर्ण काळजी घेऊन कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला तर नक्कीच त्यांना फायदा होतो. शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून आणि एक शेतकरी या व्यवसायाचा अवलंब करतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम