कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्या ; भाजपा जिल्हाध्यक्ष आहेरांची राज्य सरकारकडे मागणी

0
25

देवळा प्रतिनिधी : उन्हाळी कांद्याला मिळत असलेल्या अल्प बाजार भावामुळे राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान द्यावे ,अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे . पत्रकाचा आशय असा की , कसमादे परिसरातील शेतकऱ्यांचे नगदी पीक हे कांदा आहे .

महागडे कांदा बियाणे घेऊन , शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे . यात मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला . यामुळे हजारो रुपये खर्च करून लागवड केलेल्या कांदा उत्पादनात कमालीची घट झाली . यात बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल होत नाही . अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी जात असून, मागील भाजपच्या सरकारने कांद्याला अनुदान दिले होते . याने शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता .

कांद्याचे भाव कोसळल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने याचे नैराश्य येऊन ,तालुक्यातील खुंटेवाडी येथील युवा शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली . यामुळे राज्य सरकारने याची दखल घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेवटी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी शेवटी केली .

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here