द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दिवाळीत जास्त दिवस बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना त्याचा थेट फटका बसला आहे.
आज कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मार्केट बंद नंतर उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने बाजार समित्या फुल झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी कांदा विकण्याची घाई केली असल्याने, प्रत्येक मार्केट मध्ये गर्दी झालेली पाहायला मिळाली.
11 नोव्हेंबर रोजी उमराणा बाजार समितीत उन्हाळी कांद्याची प्रंचड आवक झाली. उमराणे बाजार समितीच्या दोन्ही बाजार समितीत सकाळ च्या सत्रात तीन हजारांवर वाहनांची गर्दी झाल्याने, उन्हाळ कांद्याची प्रचंड आवक झाली.
बाजारात कांद्याचे दर सातशे ते एक हजार रुपयांनी घसरले आहेत. दुपारच्या सत्रातील बाजार भावात थोडी सुधारणा झाली होती.
10/11 दिवस बाजार समितीचे कामकाज बंद राहिल्याने आवक वाढली. स्वर्गीय ग्यानदेव दादा देवरे बाजार समितीच्या आवारात एकुन 1577 वाहनांची विक्रमी गर्दी झाल्याने, भाव सातशे ते आठशे रुपयांनी घसरले. तिच परिस्थिती फुलेनगर खारीफाटा येथील खाजगी बाजार समितीत होती.
एकूण 1224 वाहने आल्याने, कांदा भावात मोठी घसरण झाली. उन्नाळ कांद्याचे कमीत कमी 750 ते जास्तीत जास्त 2600 याप्रमाणे भाव होते. तर सरासरी भाव 1700 ते 1800 पर्यंत होते.
तसेच देवळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकूण 380 वाहने आली होती. तिन्ही बाजार समिती मिळुन, एकुण 3180 विक्रमी गर्दी झाली. यामुळे व्यापाऱ्यांचेही धाबे दणाणले होते. तर कांदा भावात मोठी घसरण झाली. बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारात दाखल केलेली वाहनं कमी भाव पुकारले त्यामुळे इतरत्र हलविण्यात आली.
देवळा तालुक्यात कालच्या तारखेला 50 हजार क्विंटल पेक्षा जास्त आवक झाल्याने, बाजार समित्यांमध्ये वाहन उभे करायला ही जागा उपलब्ध नव्हती. नोव्हेंबर अखेर पर्यंतच उन्हाळ कांद्याची मागणी राहील. नंतर ती कमी होईल हे जरी खरे असले तरी, लाल कांद्याची आवक अजून खुपच कमी आहे. काल सकाळी फक्त 48 लहान मोठी वाहनं लाल कांद्याची आवक होती.
अजून महीनाभर अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी न करता, चाळीत साठवलेला कांदा थोडा थोडा बाजारात आणने गरजेचे आहे. असं ठाम मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर यांनी व्यक्त केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम