नाशिक प्रतिनिधी : राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आज मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन झालेल्या कसारा घाटात ‘ ब्रेक फेल पॉइंट’ जवळ एका आयशर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशरने पुढे जाणाऱ्या कार व ट्रकला जोरदार धडक दिली. या आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला.
आयशर ने धडक दिल्यानंतर आयशर जागीच पलटी झाला असुन या अपघातात एक जण गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात झाल्यावर काही वेळाने याच जागेवर उतार उतरत असताना स्पीडब्रेकर वर एक कंटेनरने सलग चार वाहनांना धडक दिली आहे.
या अपघातात सहा महिला जखमी झाल्या असून महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे व पोलीस पथक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या नागरिकांना नरेंद्र महाराज रुग्ण संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. आता वाहतुक सुरळीत झाली असून पोलीस पुढील तपास करीतआहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम