द पॉईंट नाऊ ब्युरो : काळाच्या ओघात शेतकरी देखील कमर्शिअल होत आहे. ऊस हे सर्वात मोठे पिक असताना देखील यंदा बदलत्या वातावरणामुळे ऊसाला फाटा देत शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहे. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पिक आहे. परंतू, सध्याची बदलती परस्थिती आणि भविष्यातील दर, याचा विचार करता नगर, नाशिक जिल्ह्यात ऊस लागवडीपेक्षा कांदा उत्पादनावरच अधिक भर दिला जात आहे.
काळाच्या ओघात शेतकरी देखील कमर्शिअल होत आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पिक असताना देखील यंदा बदलत्या वातावरणामुळे ऊसाला फाटा देत शेतकरी कांदा लागवडी कडे कल वाढतोय, पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पिक आहे. परंतू, सध्याची बदलती परस्थिती आणि भविष्यातील दराचे विचार करता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात ऊस लागवडीपेक्षा कांदा उत्पादनावरच अधिक भर दिला जात आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,आता हे नुकसान नगदी पिकातून भरुन काढण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला आहे.
पोषक वातावरण अन् चार महिन्यात पीक पदरात पडत असते मध्यंतरी अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय कांद्याच्या रोपावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय 15 ते 30 डिसेंबर दरम्यान कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याचे कृषी विभागानेच सांगितले आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून कांद्याची लागवडीची लगबग सुरु असते, पण आता ऊसाला बाजूला सारुन कांदा लागवडीवर भर आहे.
पाण्याचाही मुबलक साठा
पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी हा पाऊस रब्बी पिकांसाठी उपयुक्त आहे ,जलसाठ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने शेतीसाठी असलेले राखीव पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला आहे. सध्या कांद्याच्या दरात चढ-उतार होत असला तरी अनेक क्षेत्रावरील रब्बी कांद्याचे नुकसान हे पावसामुळे झाले आहे. घटत्या उत्पादनामुळेच दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना असल्यानेच कांदा लागवडीवर भर दिला जात आहे. त्यामुळे यंदा तर निसर्गाने साथ दिली तर ऊसाच्या तुलनेत कांद्यातून अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. सध्याचे पोषक वातावरण आणि कांदा दराबाबत आशादायी चित्र निर्माण होत आहे, यामुळेच कांद्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे रासायनिक खतांच्या वाढत्या किंमति ऊस ऊत्पादकांच्या साठी समस्या ठरत आहे.
उस या पिकासाठीचा रासायनिक खतांचा खर्च खुप मोठा आहे, या वर उपाय म्हणून ऊस पिकाला बगल दिल्याने, रासायनिक खतामधे मोठ्या प्रमाणात बचत तर होतेच , उस उत्पादकांनी कांद्याकडे कल चांगलाच वाढवलेला दिसत आहे.
– कुबेर जाधव
(संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांद्या उत्पादक संघटना
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम