सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी :उसाच्या रास्त व किफायतशीर दरात पाच रुपये प्रति क्विंटलप्रमाणे केलेली वाढ अंत्यंत तुटपुंजी आहे. ती किमान ५० रूपये प्रतीक्विंटल म्हणजे ५०० रुपये प्रति टनप्रमाणे दरवाढ केली असती तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला असे म्हणता आले असते. वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती, इंधनाच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ व त्याचबरोबर साखरेला मिळत असलेला चांगला दर या सर्व गोष्टींचा विचार करता किमान ४०० ते ५०० रु. प्रतीटन दरवाढ अपेक्षित होती असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक व सहकारतज्ञ कुबेर जाधव यांनी व्यक्त केले.
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०% साखर उताऱ्यांच्या आधारावर उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) २९० रुपये प्रति क्विंटल (२९००/प्रतिटन) करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एफआरपी मध्ये फक्त प्रति क्विंटल पाच रुपयांनी वाढ झाली. गेल्या वर्षी एफआरपीमध्ये दहा रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती. रासायनिक खते, इंधनाची झालेली प्रचंड दरवाढ, इतर कृषीपुरक वस्तुंच्या वाढलेल्या अवाजवी किंमती विचारात घेता केंद्र सरकारने वाढवलेली ५० रू प्रतीटन दरवाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे.
यावेळी बोलतांना श्री.जाधव म्हणाले कि सध्या साडे सात ते आठ टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे. पुढील काही वर्षांत हे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत होणार आहे. थेट उसाच्या रसापासून ही इथेनॉल निर्मिती ची प्रक्रिया काही कारखान्यांनी सुरू केली आहे.
हे सगळे पाहता ऊसउत्पादक शेतकऱ्यांना याबाबत न्याय मिळायला हवा. असे झाले तरच उसाच्या क्षेत्रात वाढ होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम