नाशिक प्रतिनिधी : शेतकरी हवालदिल झालेला असतांना पुन्हा वातावरणातील बदलाने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तसेच अनेक ठिकाणी बर्षवृष्टी देखील होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात होत असून. राज्यात देखील गारठा चांगलाच वाढला आहे. राज्यात पुणे, सातारा, सांगलीसह नाशिक, उस्मानाबाद याठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही गारठा वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात विजा आणि गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रात आज तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, सोलापूरमध्ये तापमान हे 14, पुणे-131, सातारा-13.1 , नाशिक-12.3, नांदेड- 13.8, सांगली-13.4, मालेगाव- 13.8, चिकलठाणा 11.7, माथेरान 14.6, उस्मानाबाद-13.6 या बदलामुळे शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम