आनंदाची बातमी! बुद्धिबळ प्रेमींसाठी नाशिकमध्ये रंगणार राष्ट्रीय बुद्धिबळ सामना

0
22

नाशिक: नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून (Nashik District Chess Association) 27 ते 30 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे (National fast and super fast chess competitions) आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धा नाशिकरोड येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन अकादमी, आय. एस. पी. कॉलनी, विभागीय आयुक्तालयाजवळ पार पडतील. मुख्य म्हणजे राष्ट्रीय जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनाचा मान नाशिक जिल्ह्यास पहिल्यांदा मिळाला आहे.

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना ही महाराष्ट्र चेस असोसिएशनशी (Maharashtra Chess Association) आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या अखिल बुद्धीबळ महासंघाशी संलग्न असल्याने या स्पर्धेस महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची अधिकृत मान्यता तसेच संपूर्ण सहकार्य असणार आहे. निवड प्रक्रियेसाठी 30 पेक्षा अधिक राज्यातून 500 ते 750 खेळाडू अपेक्षित आहेत.

खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था जिल्हा संघटनेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर अर्जुन पुरस्कार प्राप्त व भारतीय टीमचे प्रशिक्षक प्रविण ठिपसे (Pravin Thipse), पदमश्री व महिला इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे (Bhagyashree Thipse), ग्रँडमास्टर दिव्या देशमुख (Divya Deshmukh) या मराठमोळ्या बुद्धिबळपटूंसह ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण, अरविंद चिदंबरम, निलोपतल दास, गोपाल नारायण, मित्रभ गुहा तसेच इंटरनॅशनल मास्टर प्रणव आनंद, फिडे मास्टर आराध्य गर्ग, निरंजन नवलगुडे यांचा खेळ बघण्याची तसेच त्यांच्यासोबत खेळण्याची संधी नाशिककरांना या निमित्याने मिळणार आहे.

स्पर्धेचे थेट प्रक्षेपण विविध डिजिटल माध्यमांतून केले जाणार असून 27, 28 आणि 29 एप्रिलला जलद स्पर्धेचे एकूण 9 सामने खेळण्यात येणार आहे तर 30 एप्रिलला अति जलद प्रकारातील 11 डाव खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या विजेत्याला एकूण 6 लाख 50 हजारांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी विनायक वाडीले, जयेश भंडारी, विक्रम मावळंकर यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र सोनवणे, जयराम सोनवणे, भुषण पवार, गौरव देशपांडे, भुषण ठाकूर, अजिंक्य तरटे, मंगेश गंभीरे, सचिन निरंतर, माधव चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here