भूषण चोभे
येवला प्रतिनिधी : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे साहेब तसेच विश्वस्त यांची लाभली. कार्यक्रमाप्रसंगी गुरुकुलातील शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या वेशभूषा साकारत अध्यापनाचे कार्य सुरळीत पार पडले. मानवी जीवनातील शिक्षकांचे महत्व व समाजात असलेली शिक्षकाची गरज या विषयावर आधारित गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. गुरुकुलातील शिक्षक प्रविण निंबाळकर, शीतल महाले,व नरेंद्र म्हसे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार मांडले.
तसेच शरद ढोणे यांनी ‘गुरुजी’या विषयावर आधारित कविता सादर केली. गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कार्यक्रमास पुरणगाव गुरुकुलाचे सर्व विश्वस्त मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका कदम या विद्यार्थ्यांनीने तर मुख्याध्यापक योगेश सोनवणे यांनी प्रमुख अतिथीचे आभार मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुलाचे दोन्हीविभागाचे प्राचार्य, संकुलप्रमुख, कार्यालयीन अधीक्षक, सांस्कृतिक विभागप्रमुख, क्रीडाशिक्षक व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम