अवकाळीने कांदा ‘करपला’ ; द्राक्ष ‘तडकला’,बागलाणचा शेतकरी हळहळला

0
11

तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : थंडीची चाहुल सुरु झालेली असतांनाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन वर्षापासुन बळीराजाच्या मागे लागलेल्या या अवकाळी पावसाचे शुल्ककाष्ट संपण्याचे नाव घेतांना दिसत नाही. बुधवार(ता.१)रोजी सकाळपासुन सुरु झालेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवादिल झाला असुन, विशेषता तालुक्यातील कांदे, मका, कांदा रोप, द्राक्ष या महत्वाच्या पिकांबरोबरच इतर पिकेही संकटात सापडली आहेत.

वादळाच्या प्रभावामुळे सकाळ पासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. दुपारी बारा नंतर जोरदार सरि कोसळण्यास प्रारंभ झाला. या अचानक अालेल्या पावसामुळे शेतकऱ्याची एकच धांदळ उडालेली दिसत होती.

लबागलाण तालुक्याती तरसाळी, वनोली, औंदाणे, कौतिकपाडे ,विरगांव ,पिंगळवाडे, दसाणे, केरसाणे या परिसरातील कांदा, द्राक्षे, टमाटे, गहु, हरभरा, डाळींब, भाजीपाला आदी पिकांच्या नुकसानीला शेतकऱ्याना सामोरे जावे लागणार आहे. सोमवारपासुन तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतातील कांदा, कांदा रोप, द्राक्ष वाचविण्यासाठी पोटच्या पोरारप्रमाणे जिवापाड जपत असुन महागड्या औषध फवारण्या शेतकरी करत आहेत. शेतमजुरांना पावसामुळे माघारी जावे लागले. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे वातावरणात बदल होऊन हवेत गारठा असून, थंडीत पावसाची भर पडल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अनेकांनी थंडीचा व पाण्याचा अशी दोन्ही रेनकोट घालुन कामाला सुरूवात केली.

पंधरा दिवसांत दोनदा ढगाळ वातावरण तयार होऊन बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने कांदा पिकावर करपा आणि गहू पिकावर गेरवा या रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असून, बागायती व रब्बी या दोन्ही पिकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. द्रांक्ष उत्पादकांचे पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तोंडाचे पाणी पळाले आहे. जनावरांच्या चाऱ्याची मोठी नासाडी झाली आहे. शेतात काढून ठेवलेल्या रांगडी कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्याची एकच धावपळ उडालेली दिसली. या अवकाळी व अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले दिसत होते.

द्राक्ष पिकाला बसणार फटका
या पावसाचा सर्वाधिक फटका काढणिवर असलेल्या व फुलोऱ्यात असलेल्या द्राक्ष बागांना बसणार आहे.दोन तीन वर्षापासुन अवकाळी पावसाने या भागातील अर्ली द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते .ती पार्श्वभुमी लक्षात घेऊन यावर्षी काहींनी उशिरा तर काही नी अर्ली अशा बागा पकडल्या आहेत. त्यामुळें आजच्या घडीला द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत तर काही काढणीच्या तोलावर आहेत. पाऊस होत असल्याने पानांवर गडांवर डावणी रोग व द्राक्षमन्यांची गळहोत आहे. तयार झालेल्या द्राक्षांच्या घडात पावसाचे पाणी साचत असल्याने घडकुज मोठ्याप्रमाणात होईल असे माहिती शेतकऱ्यानी दिली‌.

कांदा पिकावर करपा..
या पावसामुळे व ढगाळ वातावरणाच्या परिणामामुळे कांदा पिकावर माव्याचे प्रमाण वाढुन शेंडे वाकडे होऊन कांद्यावर करपा पडला आहे. यामुळे कांदा उत्पादक चिंतेत सापडले आहेत. तर महागडी कांद्याचे बियाणे घेऊन टाकलेली रोपांना पाऊस उघडल्यावर धुई व दव मारक ठरणार आहे. रोग व किड प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लआगत आहे..


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here