१मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांच्या आज औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा येत आहेत. मशिदीवरील भोंगे यांच्या आणि हिंदुत्वाच्या वादावरून चर्चेत असणारे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माननीय राज ठाकरे यांच्या सभेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना, राज ठाकरे यांचे औरंगाबाद वरील सभा आणि फडणवीस यांची बूस्टर डोस वरील सभेबद्दल मत व्यक्त केला आहे. “राज ठाकरे यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आजच्या औरंगाबादेतील सभेसाठी शुभेच्छा दिल्या. तर राज ठाकरेंनी मशींदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमवर बोलत असताना त्या म्हणाल्या की, अल्टिमेटम वगैरे असं काही नसतं. मला या शब्दाचा अर्थदेखील माहीत नाही. हे शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाहीत.
कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या , एक खासदार या नात्याने देशातील कायदा व सुव्यवस्थेमध्ये लक्ष घातले पाहीजे हे माझं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात जे घडतय ते वाईटच आहे, पण उत्तरप्रदेश आणि दिल्लीत जे घडलं ते फारच वाईट आहे. मला या घटनांच्या वेदना झाल्या. महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती सांभाळण्यासाठी सक्षम आहे.
तर दुसरीकडे मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बूस्टर डोस सभा आयोजित केली आहे यावर मुंबईत महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल आज विरोधीखासदार सुप्रिया सुळे यांनी, “हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्दच नव्हता. नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं, ती वास्तविकता थोडीच असते ते नाटक असतं.” असं म्हटलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम