‘वेड लागले’ प्रेक्षकांच्या पसंतीस ; ‘प्रिया बुरकुलेच्या’ आवाजाची प्रेक्षकांना भुरळ

0
25

वेड लागले लॉंच सोहळा प्रसंगी सर्व मान्यवर

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अरविंद एंटरटेनमेंट प्रेझेंट ‘वेड लागले’ हे मराठी ऑफिशियल अल्बम सॉंग गेल्या महिन्यात शूट झाले असून याचे दिग्दर्शन प्रदिप भोई यांनी केले आहे,चित्रीकरण पाल व मध्य प्रदेश मध्ये केले आहे.प्रवीण लाड यांनी नवोदित कलाकारांना घेऊन एक भन्नाट स्क्रिप्ट गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेट दिली आहे.

‘तुझे पैंजण’ या मराठी रोमॅंटिक सॉंग नंतर अरविंद इंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एक धडाकेबाज रोमँटिक सॉंग घेऊन आले आहे . दिनांक 1 सप्टेंबर रोजी अरविंद इंटरटेनमेंट च्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला ‘वेड लागले’ हे फुल साँग रिलीज झाले.

‘बंधन प्रोडक्शन’ आणि ‘भाग्यदीप म्युझिक’ हे या गीतामध्ये असोसिएट पाहणार असून प्रवीण लाड , पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी गाण्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे सोबतच नेहा वंदना सुनील, खुशबू शिंदे, ऋतिका पाटील, रितेश इंगळे आणि अजय सोनवणे यांनी सह कलाकाराची भूमिका निभावली आहे. गाण्याचे बोल हे प्रवीण लाड यांचे असून, कम्पोसिंग मध्ये प्रवीण लाड आणि कुणाल पवार यांनी काम केलं आहे.


प्रिया , कुणाल यांच्या आवाजाचे प्रेक्षकांवर गारुड

प्रिया बुरकुले व कुणाल पवार यांनी हे गीत गायले आहे. या दोघांच्या आवाजात भन्नाट अस गायन झाले आहे. नवोदित कलाकारांच्या या गायनाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

खानदेश मधील सुप्रसिद्ध असलेले ‘डीजे प्रमोद’ यांनी गाण्याला रिदम व म्युझिक दिले आहे.

चित्रीकरण आणि संकलनात नामांकित बंधन प्रोडक्शन आणि ब्लॅक व्हाइट सिनेमा यांनी गाण्यामध्ये चित्रीकरण भूमिका केली आहे. ड्रोन पायलट म्हणून रावेर येथील मनोज तडवी यांनीही काम केले आहे,

सुप्रिया ढोके यांनी वेशभूषा तर खुशबू शिंदे यांनी कलाकारांचे मेकअप आणि कोरिओग्राफी केली आहे.

फर्स्ट लूक आणि टीझर नंतर प्रेक्षक गाण्याची आतुरतेने वाट पाहत असून वेड लागले हे सॉंग प्रेक्षकांना युट्युब आणि टीव्हीवरती सुद्धा बघता येणार आहे. १ सप्टेंबर ला गाणं हे प्रदर्शित झाल असून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गरम्य लोकेशन आणि अतिशय रांगडी कहाणी असणार हे गाणं सर्वांच्याच तोंडावर गेल्या २ दिवसांपासून दिसत आहे. धनगरी लूक मध्ये प्रविण लाड हे यात काम करताना दिसत आहेत तर पायल राऊत आणि शुभम चिंचोले हे शहरी लूक मध्ये गाण्यात दिसत आहेत. प्रिया बुरूकले हिने या गाण्यातून पदार्पण केले आहे. तब्बल २० हजार व्ह्यूज हे गाण्याला फक्त २४ तासात गेले असून प्रेक्षकांना गाण्याने वेड लावले आहे.

गाण्याचे रेलीसिंग हे कोथरूड, पुणे येथील मेट्रो सिटी हेल्थ क्लब येथे साँग रीलिझिंग चा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाला वेड लागले साँग ची संपूर्ण टीम उपस्थित असून लोकप्रिय टिक टॉकर्स म्हणजेच आदित्य सातपुते, स्नेहल प्रधान, शिवानी जाधव, गणेश चोरागे, विजया तोडकर, मयुरी मोडक, लावणी सम्राट किरण कोरे,सानिका भोईटे, राहुल प्रधान, योगेश गिरी, शुभदा पाटील, दीक्षा शिंदे, सागर कांबळे, जय भोसले, शिवानी कांबळे (kuki), शिवणी मोझे, भाग्यश्री जाधव, प्रतिभा जोशी, शुभम कावरे, निकिता भोरापकर, शिवानी जाधव आणि इतर नामांकित इन्फ्ल्येन्सर्स सुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संपूर्ण मॅनेजमेंट हे अरविंद एंटरटेनमेंट चे संस्थापक प्रविण लाड व अ.भा.वि.प. चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते. दिगंबर पवार आणि अंजुम शहा यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमात लाभले. ग्राहक दृष्टि हे गाण्याचे आऊटरिच पार्टनर असून ब्लॅक व्हाईट सिनेमा , ब्लॅक बिस्ट्रो फाईन डाईन रेस्टॉरंट धुळे व श्री रामरक्षा कृषि केंद्र हे गाण्याचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून सहकार्य लाभले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here