Skip to content

राज्यात आसनी चक्रीवादळाचा परिणाम; मुंबईसह मराठवाड्यात बरसणारा पाऊस


महाराष्ट्रातील जनतेला कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा. भारतीय हवामान विभागाने आसनी चक्रीवादळाबाबत सर्तकतेचा इशारा दिला होता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचं आता तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं आहे.

आसनी चक्रीवादळाचा परिणाम अनेक राज्यातही झाला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी भुरभुर पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. आसनी चक्री वादळाचा प्रभाव राज्यातल्या अनेक भागात होणार आहे.

हवामान विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून असानी चक्रीवादळाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात दिला आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळतंय. त्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.निश्चितच मुंबईकरांना उष्णतेपासून आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणाही ढगाळ वातावरण असेल. असनी चक्रीवादळाचा परिणाम कर्नाटक आणि केरळ या राज्यांवरही होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!