द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने एकाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या एका वर्षापासून आरोपी १३ वर्षीय दोन्ही मुलींना वसई भागातल्या एका जंगलात घेऊन जायचा आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार करायचा, अशी माहिती मिरा भाईंदर- वसई विरार पोलीस नियंत्रण कक्षाने दिली आहे.
या माणसाने या मुलींकडे ७० हजार रुपयेही मागितले होते. जर पैसे दिले नाहीत, तर तुमचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकेन अशी धमकीही त्याने या मुलींना दिली. या मुलीच्या पालकांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या तक्रारीनुसार या आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३७७(अनैसर्गिक संभोग), ३८४(खंडणी) आणि ५०६ (धमकी) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम