मुंबई : ९ दिवस आणि ९ रात्रींच्या सत्तानाट्याचा खेळावर अखेर काल रात्री पडला पडला. तिन्ही भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन अजीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना काल राजीनामा द्यावा लागला. पानपट्टीवाले, रिक्षावाले यांना शिवसेनाप्रमुखांनी इतकं सगळं दिल्यानंतरही ते इमानाने वागले नाहीत, त्यांनीच दगा दिला, अशी खंत व्यक्त करत काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये अतिशय भावनिक पण तितकचं कणखर भाषण केलं. राज्यातील बहुतांश जनता त्यांच्या धीरोदात्तपणाचं कौतुक करत आगहे. पण त्याचवेळी त्यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
आपल्या बंधूंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया काय असणार? ते काय बोलणार? ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यावर कोणत्या शब्दात टीका करणार?, याकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं. पण उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर १५ तासांनी ट्विट करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजू लागतो त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो”, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये कुठेही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाहीये. पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी मावळत्या मुख्यमंत्र्यांवर टीकेला बाण सोडलाय.
दुसरीकडे मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. १० मे रोजी राज यांनी एक ट्विट केलं होतं. त्यावेळी मशिदीवरील भोंग्यांचा विषय चर्चेत होता. राज यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलनं करणाऱ्या, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरून राज यांनी एका पत्राच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम