Skip to content

नवी मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला; हॉलमध्ये लादी बसवताना घडली दुर्घटना


नवी मुंबई :

नेरूळ येथील शनि मंदिराजवळ असलेल्या जिमी पार्क या इमारतीचा काही भाग कोसळला असून यात काही रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीचा सहाव्या मजल्यावरील काही भाग कोसळून तो थेट तळमजल्यापर्यंत आल्याने इमारतीला मोठे भगदाड पडले आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.चार जणांना सुखरूप बाहेर काढले

या दुर्घटनेची माहिती मिळताच नेरूळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. आता ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिमी पार्क ही इमारत नेरूळ, सेक्टर १७ येथे आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर एका घरात लादी बसविण्याचे काम सुरू होते. घराच्या हॉलमध्ये हे काम सुरू असताना काही स्लॅब कोसळला. वरून वजनदार स्लॅब कोसळल्याने खालच्या मजल्यावरील स्लॅब देखील कोसळला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!