शून्यातून जग उभं करणं ही म्हण आपणा सर्वांना परिचित आहेच. पण ती प्रत्यक्षात उत्तरवण्याला जिद्द लागते. स्वप्न बघावीत पण ती नावाला नाहीत तर प्रत्यक्षात उतरवावीत. असच आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय पुण्यातल्या एका सामान्य कुटुंबातील युवकाने. अशोक शिंदे यांचा संवादिनी कलामंच आणि झी म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तू येतेस मनी’ या मराठी अल्बम नुकताच रिलीज झाला.
स्वतःच्या गाण्याच्या निर्मितीतून अशोक शिंदे यांनी एक झेप घेतलीय. सामान्य कुटुंबातील पण प्रोड्युसर, कवी, अभिनेता आणि गीतकार अशा चौफेर भूमिका निभावत स्वप्नपूर्तीचा दिवस पाहणारे अष्टपैलू युवक अशोक शिंदे.
कोविडच्या नियमांचं पालन करत अशोक शिंदे यांच्या ‘तू येतेस मनी’ अल्बमच्या पोस्टर नुकतंच उत्साहात लॉन्च करण्यात आलं
IICMR कॉलेज च्या प्राचार्या डॉ. दिपाली सवाई आणि माजी महापौर राजू मिसाळ यांच्या हस्ते अल्बमचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं.
अल्बमचे संगीतकार, दिग्दर्शक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनी वादक संतोष घंटे, महापौर राजू मिसाळ, प्राचार्या डॉ. दिपाली सवाई सर्वांनीच अशोक यांच्या वाटचालीचे कौतुक केले.
स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असणारी जिद्द मनी बाळगून अशोक शिंदे यांनी त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सिटी वन स्टुडिओचे मंदार ढुमने यांची अशोक यांना रेकॉर्डिंगसाठी वेळोवेळी मदत झाली. या अल्बममध्ये तेजल ढवळकर या अशोक यांच्या समवेत झळकणार आहेत.
कार्यक्रमाचं सुत्रसंचालन श्रद्धा वाघ आणि निलेश कुटे यांनी केलं. तर क्षितीजा राऊत, पंकज इनामदार, विशाल डेरे, स्वप्नील माने, स्वाती कदम, स्वप्नील काजरे, पूजा जगताप, रोहित साळवे, राहुल कापसे, रोहित भोसले, अमोल ढोणे, योगीराज मुंढे,अमित गावडे आदी कार्यक्रमात उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम